Take a fresh look at your lifestyle.

एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री; ‘या’ नेत्याचे मोठे भाकीत

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी राज्यभरातील जिल्ह्यांचा दौरा करून ‘शिवसंवाद यात्रा’ सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा मालेगावात पोहोचल्यानंतर येथील जाहीर सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे हे तात्पुरते मुख्यमंत्री असल्याचा दावाही केला.

हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन; मृतांचा आकडा २१ वर, अनेक जण बेपत्ता

एकनाथ शिंदे तात्पुरते मुख्यमंत्री असून हे सरकार बेकायदेशीर, बेईमान आणि देशद्रोही आहे. त्यामुळे ते कोसळल्याशिवाय राहणार नाही, पन्नास थर लावून दही हंडी फोडल्याचे हे लोक सांगतात. पण तुम्ही पन्नास थरांऐवजी पन्नास पेट्या टाकून दही हंडी फोडली आहे, असा घणाघात यावेळी त्यांनी केलाय.

गोविंदा आरक्षण : स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी संतप्त

यावेळी आदित्य ठाकरे यांनी दादा भुसे यांच्यावरही जोरदार टीका केली. येथील आमदाराला मंत्रीपद देऊन त्यांना कृषीमंत्री केले, असे आदित्य ठाकरे यांनी दादा भुसे यांचे नाव न घेता सांगितले. मात्र, सध्याच्या सरकारने काय दिले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी जनतेला केला. लवकरच मध्यावधी निवडणुका होणार असून त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.