Take a fresh look at your lifestyle.

पहिल्यांदाच विठ्ठलाच्या महापूजेचा बहुमान एकनाथ शिंदेंना; शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार पूजा!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – महाराष्ट्रात अभुतपूर्व अशा राजकीय नाट्यानंतर अखेरीस मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे (cm eknath shinde) विराजमान झाले आहे. एकनाथ शिंदे सरकार आता पूर्ण बहुमताच्या जोरावर कामाला लागले आहे. आता आषाढी एकादशीला (pandharpur ashadhi ekadashi 2022) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल रखुमाईची (vitthal rukmini mahapuja) महापूजा करणार आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदेंना आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच महापूजेचा बहुमान मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिले महत्वाचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, अखेरीस हा मान आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता शासकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना वेग आला आहे. महापूजेचं निमंत्रण देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आमंत्रण देण्यासाठी पोहोचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा पार पडणार आहे.

Alert! राज्यात सर्वत्र दमदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये NDRF ची पथके तैनात

विणा, विठ्ठल रखुमाईंचा फोटो, तुळसी माळी आणि टोपी घेवून समिती सदस्य मुख्यमंत्री निवासस्थानी दाखल झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे पोहोचले आहे.१० जुलैला आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी वारकरी आपणास महापूजेला येण्याबाबत विचारणा करत असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे मुंबईत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापूजेचे निमंत्रण दिले होते. पण त्यानंतर शिंदे यांनी बंड पुकारला आणि देवेंद्र फडणवीस हे महापूजा करतील अशी शक्यता निर्माण झाली होती. पण अचानक मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव आलं आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री आता विठ्ठल रखुमाईची पूजा करणार आहे.

‘होय, सर्व आमदार ED मुळेच आमच्याकडे आले’; सभागृहात फडणवीसांचा खुलासा

Leave A Reply

Your email address will not be published.