Take a fresh look at your lifestyle.

शिवसेना मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचा पुन्हा मास्टर प्लान?

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सेनेतील बऱ्याच आमदारांनी राजीनामा देत शिंदे गातात सहभाग नोंदवला. थोडक्यात, राज्यात मोठ्या प्रमाणात एकप्रकारचं राजकीय नाट्य पाहायला मिळालं.

दरम्यान, याच सत्तानाट्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अशातच, महाराष्ट्रात शिवसेनेला पुन्हा ताकद देण्यासाठी आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रा करत आहेत.मात्र, याच शिवसेनेला आपलं करण्यासाठी एकनाथ शिंदेंही शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आदित्य ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.

पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरेंनी राजकीय पाया मजबूत करण्यासाठी ज्या-ज्या जिल्ह्यांचा दौरा केला आहे, त्याच जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शुक्रवार पासून मोठ्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता शिंदे विरुद्ध ठाकरे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई आणखी तीव्र होणार आहे.

सध्या, आपले आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा पुन्हा मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेना युवा युनिटचे अध्यक्ष आदित्य ठाकरे महाराष्ट्रात ‘शिवसंवाद यात्रा’ करत आहेत. त्याच धर्तीवर आता शिवसेनेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राज्यात शर्यत सुरू आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा शुक्रवारपासून अधिकृत दौऱ्यावर निघाले आहेत. याच जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे हे तीन दिवस दौरा करणार असून आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला ते उत्तर देणार आहे. इतकंच नाहीतर आपल्या दौऱ्यात शिंदे त्या आमदारांची भेट घेणार आहेत ज्यांच्यावर शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेंनी टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.