Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना निवडणूक आयोगाचा दणका; पाच वर्षांसाठी अपात्र ठरवलं

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पाकिस्तानला मोठे स्वप्न दाखवत शेजारी देशामध्ये आतंकवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तसेच अल्पावधीतच पाकिस्तानचे आर्थिक दिवाळे काढणारे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानातील निवडणूक आयोगानेच आरसा दाखविला आहे. तोषखाना प्रकरणी निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना दणका दिला असून पुढील ५ वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

अनिल देशमुखांची दिवाळी कारागृहातच; जामीन अर्ज फेटाळला

तोषाखाना हा पाकिस्तानच्या कॅबिनेटच्या नियंत्रणाखाली असलेला विभाग असून या अंतर्गत देशातील विविध मान्यवरांना मिळालेल्या भेटवस्तू संग्रहित करण्याचे कार्य केल्या जाते. इम्रान खान यांनी तोषाखाना विभागासंदर्भात खोटे विधान केले होते व तपासाअंती ही बाब उघड झाली असून निवडणूक आयोगाने इम्रान खान यांच्यावर पुढील ५ वर्षासाठी राजकीय अपात्रतेचा निर्णय दिला आहे.

नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक? अजामीनपात्र वॉरंटच्या आदेशाने अडचणीत वाढ

हा निर्णय इम्रान खान यांच्या पक्षाच्या चांगलाच जिव्हारी आला असून पीटीआय या इम्रान खान यांच्या पक्षनेत्याने जनतेला चिथावणी देत घराबाहेर पडत या निर्णयाचा विरोध करण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी इम्रान खान यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असून यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.