Electric Scooter | बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये 145 किलोमीटर धावणार..
Electric Scooter: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे गेल्या काही दिवसांत ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यात अतिशय कमी किमतीत चांगली रेंज व हायटेक फीचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर मिळत आहेत. tvs electric scooter price
इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असताना, भारतीय बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर दाखल झाली आहे. TVS Electric Scooter तुम्ही जर चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही स्कूटर तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. तर या स्कुटर बद्दल जाणून घेऊ या..
ही इलेक्ट्रिक स्कूटर TVS कंपनीची आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव TVS iQube ST असं आहे. या कंपनीची ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे, अशी रिपोर्टनुसार माहिती मिळालेली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक कंपन्यांच्या स्कूटरला टक्कर देत आहे. चला तर मग या स्कूटरची सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
best electric scooter इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती
TVS iQube ST इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 4.56 kW क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. त्यास आउटपुट असलेली इलेक्ट्रिक मोटर जोडलेली आहे.
सामान्य चार्जरने चार्ज करायचे झाल्यास, ही बॅटरी 4 ते 6 तासांत पूर्ण चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. 0 ते 80 टक्के दरम्यान बॅटरी चार्ज होण्यास 4 तास 6. मिनिटे एवढा वेळ लागतो. electric scooter price
जर फास्ट चार्जरने चार्जिंग केल्यास 2 तास 30 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्जिंग होते.
एकदा ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर रायझिंग मोडमध्ये 145 किलोमीटर तर पॉवर मोडमध्ये 110 किलोमीटर रेंज देते. या रेंजसह स्कूटरचा सर्वोच्च वेगही मिळतो.