Take a fresh look at your lifestyle.

कृषी वीज जोडणी व थकीत वीजबिलासाठी मोटारसायकल रॅली

0
maher

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासे : महावितरण नेवासा उपविभागामार्फत आज ‘ कृषी वीज जोडणी धोरण २०२०’च्या व्यापक प्रचारासाठी तसेच थकीत वीजबिल भरण्यासाठी जनजागृतीपर मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

सदर रॅलीमध्ये नेवासा उपविभाग उप कार्यकारी अभियंता चेचर, सहाय्यक अभियंता मनोहर पाटील शेजुळे, राकेश भंगाळे, विजय पाटील, किशोर कायस्थ, मालुंजकर, शरद अरगडे, भूषण पवार तसेच जनमित्र रवी कांबळे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. सदर रॅलीसाठी अधीक्षक अभियंता .काकडे यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान ही रॅली नेवासा खुर्द, नेवासा बु. नेवासा फाटा येथे घेण्यात आली. या हि रॅलीला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.