Take a fresh look at your lifestyle.

Electric vehicles ‘ही’ नवी इलेक्ट्रॉनिक स्कूटर ठरतेय अनेकांची पहिली पसंत; काय आहे खास?

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई Electric vehicles सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे बहुतांश लोक इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करू लागले आहेत. ऑटोमोबाईल कंपन्याही ग्राहकांच्या पसंतीत झालेला हा बदल लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) लाँच करत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये सर्वांत मोठी कमतरता, त्यांची रेंज (Electric scooter range) आहे. कित्येक गाड्या फुल चार्जमध्ये 100 किलोमीटरही जात नाहीत. अशातच, ओकीनावा (Okinawa electric scooters) कंपनीने एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 140 किलोमीटर जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. टाईम्सबुल या वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आता Driving License बनवणं झालं अधिकच सोपं, जाणून घ्या नवीन प्रोसेस

अवघ्या 4-5 तासांत होते पूर्ण चार्ज
ओकीनावा या ऑटोमोबाइल कंपनीने नुकतीच ‘आय प्रेझ प्लस’ (Okinawa iPraise+) ही स्कुटर लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर असून, यामध्ये 3.3 KWH क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी बीएलडीसी तंत्रज्ञानावर आधारित आहे. याची विशेष बाब म्हणजे, साध्या चार्जरने चार्ज केल्यानंतर अवघ्या 4 ते 5 तासांमध्येच ही स्कूटर पूर्णपणे चार्ज (Okinawa iPraise+ battery) होते.

💥Google Pay आणि Paytm वापरताना या ५ टिप्स लक्षात ठेवाच; अन्यथा होईल…

बॅटरी फुल झाल्यानंतर ही स्कूटर सुमारे 140 किलोमीटर (Okinawa iPraise+ Range) पर्यंत चालू शकते. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या बॅटरीवर काही अटींसह सुमारे तीन वर्षांपर्यंतची वॉरंटी देण्यात येत आहे. कित्येक इलेक्ट्रिक गाड्या या वेगाच्या बाबतीत अनेकांचा अपेक्षाभंग करतात. मात्र, ओकीनावाची ही स्कूटर यामध्येही पुढे आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 58 किलोमीटर प्रतितास (Okinawa electric scooter speed) असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

फक्त ३० हजारात सुपर स्पोर्ट्स बाईक घरी घेऊन जा, मिळेल फास्ट स्पीड आणि जबरदस्त स्टाईल

अनेक फीचर्स, लुक जबरदस्त
या स्कूटरमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल स्टुडंट कन्सोल, डिजिटल ट्रिप मीटर, डीआरएलएस, डिजिटल ऑडोमीटर सर्व्हिस इंडिटेकटर, डबल डिस्क ब्रेक कॉम्बिनेशन, साईड स्टँड सेन्सर, मोबाईल अ‍ॅप कनेक्टिव्हिटी यांसह कित्येक आधुनिक फीचर्स (Okinawa iPraise+ features) मिळतात. ही गाडी दिसायलाही अगदी आकर्षक आहे. गाडीचा हेडलाईट एलईडी असून, ती होंडा डिओ या स्कूटरप्रमाणे खालच्या बाजूला आहे. लाल आणि काळ्या रंगाच्या आकर्षक कॉम्बिनेशनमध्ये ही गाडी उपलब्ध आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

किंमतही आवाक्यात
भारतात या स्कूटरची किंमत (Okinawa iPraise+ price) 1.06 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. केवळ दोन हजार रुपयांमध्ये तुम्ही या स्कूटरचं प्री-बुकिंग करू शकता. विशेष म्हणजे या स्कूटरच्या ऑन रोड किंमतीवर मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळू शकते. एकूणच कमी किमतीत भरपूर फीचर्स, चांगला स्पीड आणि चांगली रेंज असणारी इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर ओकिनावाची ही स्कूटर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते.

Comments are closed.