ओटीटी न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) हल्ली चांगलीच चर्चेत येत आहे, बहुधा वापरकर्त्यांचे ट्विट व्हायरल होत असते मात्र सध्या ट्विटरच्या नवीन मालकामुळे ट्विटर चर्चेत राहत आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून अनेक बदल या समाज माध्यमाबाबतीत (Social Media) घेण्यात आले आहे. ट्विटरच्या संबंधी चर्चेच्या विषयांपैकी कर्मचारी कपातीचा निर्णय, ब्लू टिक प्रीमियम सबस्क्रिबशन प्लॅन (Blue Tick Premium Subscription) इत्यादींचा यामध्ये समावेश राहिला आहे. आता नव्याने घेण्यात येत असलेल्या निर्णयानुसार ट्विटर जवळपास १५० कोटी निष्क्रिय खाती हटविणार असल्याची माहिती आहे.
एलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरवर जवळपास १५० कोटी अशी निष्क्रिय खाती आहेत जी एकदा लॉग इन केल्यावर परत वापरण्यात आली नाही अथवा बहुतेक वापरकर्ते पासवर्ड विसरल्याने त्यांनी परत लॉग इन करण्याचा प्रयत्न केला नाही. या सर्वांचा एकंदरीत परिणाम बघता ही सर्व खाती निष्क्रिय अवस्थेत आहेत. यामुळे ट्विटर वर नाहक तसेच निष्क्रिय अकाउंटची (Inactive Account) गर्दी झाली आहे. अशा सर्व अकाउंटला हटविण्याची कारवाई केल्या जाणार आहे, यामुळे ट्विटरवर नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कर्नाटकातील संघटनांचा उद्रेक शिगेला पोहचला; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
ट्विटरवर असलेल्या निष्क्रिय खात्याची माहिती देणारे एक अद्ययावत तसेच अचूक परिणाम देणारे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून याद्वारे निष्क्रिय, तसेच वापरातून बाद असलेली खाती संपूर्णपणे ट्विटरवरून हटविण्यात येणार आहे, ज्यांची संख्या १५० कोटीच्या घरात आहे. बोगस ट्विटर अकाउंटच्या (Fraud Account of Twitter) विरुद्ध एलॉन मस्क यांची सुरुवातीपासूनच कठोर भूमिका राहिली आहे. त्यामुळे या नवीन निर्णयामुळे ज्या वापरकर्त्यांची खाती सुमारे एक वर्षांहून अधिक कालावधीपासून लॉग इन करण्यात आली नाही ती सर्व डिलीट केल्या जाणार आहे. हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह राहणार असून, यामुळे बोगस तसेच नाहक तयार करून ठेवलेल्या खात्यांचे ट्विटरवरील अस्तित्व संपुष्टात येणार आहे.