Take a fresh look at your lifestyle.

Viral Video : रिषभ पंतनं ठोकलं शतक, राहुल द्रविडचं ‘बाहुबली’ स्टाइल सेलिब्रेशन, पाहा!

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एजबेस्टनच्या मैदानावर टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंत हा ‘वन मॅन शो’ ठरला. पंतनं १११ चेंडूंमध्ये १४६ धावा कुटल्या. पंतच्या धडाकेबाज शतकानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडनं जबरदस्त सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसामुळं काही वेळ व्यत्यय आलेल्या पहिल्या कसोटीच्या (England vs India Test) पहिल्याच दिवशी रिषभ पंतनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने आपल्या इनिंगमध्ये २० चौकार आणि चार षटकार ठोकले.

एकनाथ शिंदेंना खरंच सर्वात मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

इंग्लंडचा (England) कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिवसाच्या सुरुवातीलाच जेम्स अँडरसनसह इतर गोलंदाजांनी खोचक मारा करून भारतीय फलंदाजीला जेरीस आणले.

१०० धावांच्या आतच भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला. स्टोक्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात संपूर्ण चित्र बदललं. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं ७ विकेट गमावून ३३८ धावा केल्या. रवींद्र जडेजाने ८५ धावा केल्या असून, तो नाबाद आहे. तर त्याच्यासोबत मोहम्मद शमी हा खिंड लढवतो आहे.

देवेंद्र फडणवीस नाराज असण्याचं किरीट सोमय्यांनी सांगितलं खरं कारण…

पंतने चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर ओव्हलच्या मैदानावरच आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं. त्याने आतापर्यंत पाच शतके ठोकली आहेत. त्यातील चार शतके ही विदेशातील मैदानांवर आहेत. पंतने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५९ धावा, अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध १०१ धावा, याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत नाबाद १०० धावा आणि त्यानंतर एजबेस्टनमध्ये १४६ धावांची तुफानी खेळी केली.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

विशेष म्हणजे पंतने संघाला गरज असतानाच, मालिकेच्या शेवटच्या सामन्यात ही शतके केली आहेत. निर्णायक सामन्यांमध्ये पंत हा चांगली फलंदाजी करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी चित्र बदलून टाकणारा फलंदाज म्हणून रिषभ नावारुपाला येत आहे.

Comments are closed.