Take a fresh look at your lifestyle.

EPFO Salary Limit – आता हातात सॅलरी कमी आली तरी नोकरदारांनाच होणार मोठा फायदा; कसे ते वाचाच!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : EPFO Salary Limit Hike – नोकरदारांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) साठी वेतन मर्यादा 15 हजार रुपये इतकी होती. मात्र, ती आता १५ हजार रुपयांवरून 21 हजार रूपये इतकी करण्यात यावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा निर्णय झाल्यास 75 लाख नोकरदारांवर याचा परिणाम होईल.

कोकणात जात असाल तर थांबा! मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक एक महिन्यासाठी बंद! समोर आले महत्वाचे कारण

काय परिणाम होईल?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ईपीएफसाठी वेतन मर्यादा वाढवल्याने, ईपीएफमधील योगदान वाढू शकते, परंतु त्यामुळे थेट हातात येणारा पगार (टेक होम) कमी होईल. पण शेवटी त्याचा फायदा कर्मचाऱ्यांनाच होणार आहे. यामुळे त्यांची बचत वाढेल आणि EPS मध्ये अधिक योगदान मिळेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सरकारी मान्यता आवश्यक

ईपीएफओ बोर्डाच्या निर्णयाला सरकारची मंजुरी आवश्यक आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच यामुद्यावर पुढे निर्णय होऊ शकतो.

या निर्णयामुळे सरकारवर बोजा पडणार आहे. सरकार EPFO ​​च्या कर्मचारी पेन्शन योजनेवर दरवर्षी 6,750 कोटी रुपये खर्च करते. पगार मर्यादा वाढवल्यानंतर त्यासाठी स्वतंत्र तरतूद करावी लागणार आहे.

सेकंड हॅन्ड Two Wheeler चा बंपर Sale! केवळ १६ हजारांत मिळतेय Activa तर २० हजारांत मिळतेय Pulsar

शेवटचा बदल आठ वर्षांपूर्वी

EPF योजना 15 हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या नोकरदारांसाठी आवश्यक आहे. यामध्ये सरकार तुमच्या मूळ वेतनाचा 1.6 हिस्सा योगदान म्हणून देते.

पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये केल्यास 75 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळू शकतो. मागील वेळी 2014 मध्ये पगार मर्यादा 15,000 रुपये करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.