‘एक्झिट पोल’द्वारे दोन राज्यांतील विधानसभा आणि दिल्ली महापालिकेच्या निकालाची अंदाजबांधणी; चुरशीची लढत होणार

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गुजरात, हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा तसेच दिल्ली महापालिकेतील निवडणुकांनी राष्ट्रीय स्तरावर राजकीय हालचालींना वेग आणला आहे. उत्तरप्रदेशातील मैनपुरी मतदारसंघात डिम्पल यादव पोटनिवडणुकीच्या रिंगणात असल्याने येथील निवडणुकीवर देखील अनेकांचे लक्ष लागून आहे. नुकत्याच पार पडलेल्या दोन राज्यातील विधानसभा आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे एक्झिट पोल विविध माध्यमांनी जाहीर केले असून, यामध्ये दिल्ली महापालिकेत आप पक्षाचा वरचष्मा राहण्याचे संकेत दिले गेले असून, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला, आप आणि काँग्रेसचे कडवे आव्हान निर्माण झाल्याची चिन्हे आहे.

कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी आणि सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक होणार; शिक्षण क्षेत्रात नवीन बदल किती अनुकूल ठरणार?

हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप जरी अव्वल क्रमांकावर राहताना दिसत असला तरी गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त जागा मिळणार असल्याने दिसून येत आहे, इथे आम आदमी पक्ष देखील चांगला दबदबा कायम करत असताना दिसून येत आहे. यामुळे गुजरात मध्ये तिरंगी लढत होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजप मध्ये सरळ लढत झाल्याची स्थिती असून आम आदमी पक्ष पिछाडीवर राहताना दिसत आहे.

गुगल आणि अल्फाबेट कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान; भारताबद्दल काढले गौरवोद्गार

आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती, त्यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाला इथे जास्त जागा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र हिमाचल प्रदेश आणि गुजरात मध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळत असल्याचे आकडेवारी दर्शवत आहे, त्यामुळे प्रत्यक्ष निकाल घोषित झाल्यावर खरी आकडेवारी समोर येईल त्यावेळी भाजपला या दोन्ही राज्यात सत्ता कायम ठेवण्यात यश मिळणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

जनतेला महागाईतून दिलासा मिळण्याची शक्यता; पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार!

दिल्ली महापालिकेत अरविंद केजरीवाल सध्यातरी करिष्मा करताना दिसत आहे, मात्र प्रत्यक्ष निकालात ही स्थिती कायम राहणार का? हा देखील प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. भाजपने यावेळी दिल्ली महापालिकेत विजय मिळविण्यासाठी भरघोस प्रयत्न केले होते, मात्र केजरीवाल यांच्या नेतृत्वाने भाजपला येथे अपेक्षित यश गाठता येईल की एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार इथे भाजपच्या मानसुब्यावर पाणी फेरल्या जाईल? हे प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी आकडेवारी ठरवणार, तोवर अंदाज बांधणीच्या दृष्टीने घोषित झालेले एक्झिट पोल केवळ भाकीत म्हणून बघणे योग्य ठरेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.