Take a fresh look at your lifestyle.

ऐन पावसाळ्यातही ‘या’ जिल्ह्यात उन्हाळा वाढला तर…

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस थांबला असला तरी काही ठिकाणी पाऊस सुरूच आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासोबतच पावसाने काही भागात उघडीप दिले आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत महत्त्वाची बैठक

दरम्यान, राजस्थान आणि परिसरात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राहणार असल्याचे चित्र आहे. अजमेर, शिवपुरी, सिधी ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ५.८ किमी उंचीवर चक्रीवादळ वारे वाहत आहेत. दरम्यान, कोकणातील घाटमाथ्यांवर दमदार पाऊस झाल्याने भात पिकाला पोषण मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

BSNL ग्राहकांसाठी खुशखबर! ‘इतक्या’ रुपयांमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल अन् बरंच काही…

आज विदर्भात विजांसह पावसाची दाट शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आजपासून काही जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.