Take a fresh look at your lifestyle.

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची अहमदनगरमधील तपोवन रोड, हर्षवर्धन कॉलनीसह इतर ठिकाणी भेट

ओटीटी न्यूज नेटवर्क

अहमदनगर – दिनांक 23 मे रोजी नगर येथील बुऱ्हानगर ग्रामपंचायत क्षेत्रातील तपोवननगर भागातील तपोवन रोड, हर्षवर्धन कॉलनीसह इतर परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी या भागांमध्ये भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत बुऱ्हानगर सरपंच रावसाहेब कर्डिले, सोसायटी चेअरमन रंगनाथ कर्डिले, मा. ग्रा. सदस्य श्रीधर पानसरे, सोसायटी सदस्य सागर भगत, ग्रा.स. तरवडे तसेच ग्रामसेवक अधिकारी नांगरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

आता मिळवा Google Pay वरून झटपट लोन; तेही फक्त एका क्लिकवर! जाणून घ्या प्रोसेस

तपोवननगर परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेत सोयी – सुविधांची पाहणी करून तपोवन रोडवरील हर्षवर्धन कॉलनीमधील सर्व ग्रामस्थांशी यावेळी चर्चा करण्यात आली. हर्षवर्धन कॉलनीमधील ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, रोड आदी समस्यावर ग्रामस्थांबरोबर चर्चा करत विविध विकास कामावर चर्चा करत सर्व प्रश्न लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

चिंता वाढली! हवामान खात्याचा अंदाज चुकला? राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरवली

तपोवन नगर, हर्षवर्धन कॉलनी तसेच इतर परिसरातील प्रश्न व नागरिकांना येणाऱ्या समस्या याविषयी मा. आमदार कर्डिलेसाहेब यांनी स्वतः येऊन पाहणी केली. तसेच या समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले. यावेळी या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या प्रसंगी तपोवन रोडवरील हर्षवर्धन कॉलनी येथील ग्रामस्थांच्या वतीने एक छोटासा आभार सत्कार कार्यक्रम करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने मा.सौ. कांचन प्रमोद आहेर( बिडवे) – 108 अंबुलन्स जिल्हा व्यवस्थापक अहमदनगर व संजय थोरात यांच्या हस्ते मा. आमदार कर्डिले साहेब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

लग्नसराईच्या दिवसांत वाढली सोन्याची मागणी, तपासा आजचे दर

सदर कार्यक्रम प्रसंगी तपोवन नगर परिसरातील राकेश खेडकर,अमोल आव्हाड, मुकेश गायकवाड ,बाबासाहेब भवर, दत्ता निकरड, जोशी, तसेच सर्व महिला वर्ग उपस्थित होते. सर्वच नागरिकांनी येथील असणाऱ्या अडचणी स्वतः येऊन जाणून घेतल्या बद्दल मा. आमदार कर्डिलेसाहेब यांचे आभार व्यक्त केले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.