Take a fresh look at your lifestyle.

३१ चिमुकल्यांचा खून, नंतर आत्महत्या; थायलंडमधील थरारक घटना

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

थायलंड : थायलंडमध्ये गुरुवारी म्हणजेच आज एका माथेफिरूने पाळणाघरात घुसून गोळीबार केला. यामध्ये लहान चिमुकल्यांसह 31 जणांचा मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा माजी पोलीस कर्मचारी होता. या गोळीबारानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. राउटर या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली. मृतांमध्ये २३ मुले, दोन शिक्षक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे.

अंबानी कुटुंबियांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक

थायलंडमध्ये इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत बंदूक बाळगणाऱ्यांची टक्केवारी जास्त आहे. विशेष म्हणजे सरकारच्या अधिकृत आकडेवारीत गेल्या अनेक वर्षांपासून सीमेपलीकडून येणाऱ्या अवैध शस्त्रांचा समावेश नाही.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या माजी पोलीस कर्मचाऱ्याने दुपारी पाळणाघरात घुसून गोळीबार केला. एवढेच नाही तर चाकूनेसुद्धा हल्ला केला. या घटनेनंतर थायलंडच्या पंतप्रधानांनी पोलिसांना या गुन्ह्यातील दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेचा तपास सुरू आहे असून आरोपींनी गोळीबार का केला, हे अद्याप समोर आलेले नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.