Take a fresh look at your lifestyle.

देवेंद्र फडणवीस नाराज? ‘या’ कारणांमुळे चर्चांना उधाण…

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – गुरुवारी राज्याच्या राजकारणात इतिहास घडला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कालच्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागल्याने फडणवीस नाराज आहेत अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी

भाजपचा मास्टरस्ट्रोक?


शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे ३९ आमदार सोबत घेतले, तर अपक्ष आणि इतर पक्षांचे असे मिळून एकूण ५० आमदारांच्या जोरावर शिंदे गटाने मविआ सरकार विरोधात बंड केलं आणि अखेर उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. याकाळत शिंदे गटाची भाजपशी बोलणी सुरू होती.

अशात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उप-मुख्यमंत्री होतील असंचं सर्वांना वाटत होतं. मात्र काल, गुरूवारी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे होतील आणि आपण स्वतः सरकारमधून बाहेर राहू असं जाहीर केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. याला भाजपचा मास्टरस्ट्रोक म्हटलं गेलं. सुरूवातीला केवळ एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार होता. मात्र, ऐनवेळी केंद्रातील भाजपच्या हायकमांडने फडणवीसांनी उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले आणि फडणीवस राज्याचे उप-मुख्यमंत्री झाले.

ठाकरेंना मोठा धक्का! सरकारमध्ये येताच फडणवीसांचा मोठा निर्णय

फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण


एकनाथ शिंदे हे बंडखोर शिवसैनिक, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे. यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्यात तुलना केली असता फडणवीस हे शिंदेंपेक्षा सिनिअर नेते ठरतात. असं असतानाही फडणवीसांना डावलत शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. केंद्रीय भाजपच्या याच खेळीमुळे फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आंल आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा


उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट केलं की, “हा निर्णय घेऊन भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कोणतेही पद मिळवणे हे आमचे ध्येय नसून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणे हे आमचे अंतिम ध्येय आहे.”

Comments are closed.