Take a fresh look at your lifestyle.

फडणवीसांनी दिलं ‘मर्सिडीज बेबी’ नाव; आदित्य ठाकरेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. ‘मी असा कोणताही दावा केलेला नाही की मर्सिडीज गाडी चा शोध लावला किंवा मर्सिडीज गाडी बनवली’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

देशावर अर्थिक संकट! राजा कायम राहणार? पीक ते पाऊसपाणी, भेंडवळची भविष्यवाणी काय सांगते?

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई कोस्टल रोडची पाहणी केली. पहिल्या टप्यातील मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क असा दोन किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असणार आहे. याच भुयारी मार्गाची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली. त्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

ब्रेकिंग! रिझर्व्ह बॅंकेचा सर्वसामान्यांना मोठा धक्का; सर्वच कर्ज महागणार

‘मी असा कोणताही दावा केलेला नाही की मर्सिडीज गाडीचा शोध लावला किंवा मर्सिडीज गाडी बनवली. थोडा इतिहासाचा अभ्यास केला तर कुठेही इंग्रजांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता. मग ते मागील जन्मात कुठल्या बाजूने होते ते शोधावे लागेल’ असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.

17 हजारांचा फोन खरेदी करा केवळ 749 रुपयांमध्ये, Redmi च्या 5G फोनवर जबरदस्त ऑफर

‘लोकांमध्ये एक भावना आहे की राजकीय पक्ष इतिहास वरून भांडत आहेत पण जे गंभीर प्रश्न आहेत. जसे की, रोजगार, बेरोजगारी, दंगल किंवा केंद्राकडून धाडी टाकल्या जातात यावर कोणी बोलत नाहीये. आपण देश म्हणून पुढे जायचं असेल तर यावर चर्चा करायला लागणार आहे. कुठेतरी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

VIDEO -बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राज ठाकरे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं

‘भांडण करण्याचा प्रयत्न करून किंवा दंगली करण्याचा प्रयत्न करून देशाचे नाव जगात खराब होतेय. सरकारवर टीका करायची असेल तर करावी पण किती भांडणे लावली पाहिजेत यावर लक्ष्मण रेषा आली पाहिजे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.

मागच्या जन्मात कोण कुठल्या बाजूने होते ते ठीक आहे पण आता आपण भांडणे लावण्याच्या बाजूने आहात का ? आता आपण विकासाच्या बाजूने असलं पाहिजे. नागरिक विचार करत असतील की, आम्ही यांना मते देतो पण यांनी त्यानंतर इतिहासावरून भांडण्यापेक्षा विकासावर लक्ष दिले पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

तुमच्याकडे 5 रुपयांची जुनी नोट असेल तर घरबसल्या लखपती बनण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका!

‘मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत लोकांना यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये आणि लोकांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर आहे. भोंग्यापेक्षा सध्या राजकारणाचा आवाज जास्त मोठा आहे. हे राजकारण समाजकारणासाठी वापरले तर चांगले होईल आणि बाहेरील देशातील आपले भारतीय म्हणत असतील कि देश कुठे चालला आहे, असा सल्लावजा टोलाही आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला.

BREAKING! राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल; सभेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

‘मनसेनं बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. पण मला वाटतं की, राजकीय हेतूने जे होते त्याला कसे वगळायचं हे लोकांना माहित आहे. आज सर्व सुरू आहे. लोक आपआपल्या कामाला गेले आहेत. अर्थचक्र सुरु आहे. आम्ही राजकीय मंडळी म्हणून आणि खास करून इथला विरोधी पक्ष म्हणून हे करत आहेत हे लोकांना माहीत आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब यांचे ऐकणार की पवार यांचे ऐकणार असा सवाल राज ठाकरे यांनी केला. पण, आपल्या सर्वांना माहित आहे कि मुख्यमंत्री लोकांसाठी काम करत आहेत आणि लोकांचे ऐकत आहेत. महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठी काम करत आहेत,जात-पात-धर्म यावर लक्ष नाही दिलं तर बरं होईल आणि हे करण्यापेक्षा स्वतःचे वेगवेगळे व्हिडीओ दहा वर्षांपासूनचे पाहावे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.

एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होताय? आधी ‘या’ गोष्टी समजून घ्या नाहीतर होईल पश्चाताप

Leave A Reply

Your email address will not be published.