Take a fresh look at your lifestyle.

चक्क ‘या कारणासाठी’ पेट्रोल पंपावर उसळली तोबा गर्दी; सत्य कळताच पंपचालकही चक्रावले

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

हिंगोली – पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडत आहे. तसंच, इंधन दरात वाढ झाल्यानंतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यात मात्र एक वेगळाच प्रकार घडला आहे.

रशिया-युक्रेन युद्धात भारताला सर्वात मोठी संधी! शेतकऱ्यांना लागणार लॉटरी?

पेट्रोल डिझेलचे दर का वाढतात का? ही धास्ती वाहन धारकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. काल सायंकाळी उशिरा हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पेट्रोलचे दर वाढणार असून पंप चालक काही दिवस पेट्रोल पंप बंद ठेवणार आहे, अशी अफवा शहरात पसरली होती. या अफवेमुळं पेट्रोल पंपावर एकच गर्दी झाली होती.

ST Strike : अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करत केली मोठी घोषणा

पेट्रोलपंपावर अचानक गर्दी कशी झाली यावरून पंपावरील काम करणारे कर्मचारीदेखील संभ्रमात पडले होते. काही वाहन चालकांकडे विचारणा केली असता खरे कारण समोर आले. नंतर पंपचालकांनी स्‍पष्‍टीकरण देत कुठेही पेट्रोल पंप बंद होणार नाही. अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. यानंतर काही तासांनी पेट्रोल पंपावरील गर्दी कमी झाली.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.