Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी केंद्रबिंदू मानून कारभार करू : हजारे

0

अशोक निमोणकर, ओटीटी न्यूज नेटवर्क

जामखेड : कोणताही गटतट न पाहता शेतकरी केंद्रबिंदू मानून  कारभार करणार असल्याचे मत ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे यांनी व्यक्त केले. जवळा येथील सोसायटीच्या शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. या वेळी जवळा गावातुन प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

गावातील मारुती मंदिर, खाकसारवली बाबा या देवस्थानाचे दर्शन घेऊन ही रॅली जवळेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर त्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. पुढे बोलताना हजारे म्हणाले की मी माझ्या व्यवसायात अत्तापर्यंन्त एक हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याच प्रमाणे सोसायटीच्या माध्यमातून देखील शेतकर्‍यांना आर्थिक फायदा झाला पाहिजे. हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावातील सर्व जण एकत्र येऊन शेतकरी विकास आघाडी पॅनल उभा केला आहे. त्यामुळे भेदभाव बाजुला ठेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी विकास आघाडी पॅनलला निवडुन द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलचे डॉ. महादेव पवार, दशरथ हजारे, प्रशांत पाटील, राजेंद्र राऊत, डॉ. दिपक वाळुंजकर, अभय नाळे, बाबा महानवर यांनी भाषणे केली. यावेळी आदीनाथ कारखान्याचे संचालक राजेंद्र पवार, माजी उपसभापती दिपक पाटील, दत्तात्रय कोल्हे, भिमराव हजारे, सत्तार शेख, सुखदेव मते, शहाजी पाटील, पांडुरंग वाळके, पोपट शिंदे, महेंद्र खेत्रे, नवनाथ कोल्हे, पठाडे, बबन ठकाण, पांडुरंग कोल्हे, मारुती रोडे, गैतम कोल्हे, उमेश रोडे, एकनाथ हजारे, राजेंद्र महाजन, संताराम सुळ, अशोक पठाडे, संजय अव्हाड, आलम शेख, आयुब शेख, केशव हजारे, महंमद शेख, राजु महाजन व उमेदवार उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.