Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! बँकेत न जाता मोदी सरकारतर्फे मिळणार सहज कर्ज

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Kisan Credit Card Loan Scheme- भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळोवेळी अनेक योजना सरकारद्वारे राबवण्यात येतात. अशाच अनेक योजनांपैकी केंद्र सरकारची एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. आता पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून क्रेडीट कार्ड मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे किसान क्रेडिट कार्ड असेल, तर (Credit Card Loan) याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बँकेत न जाता थेट कर्ज मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी नेहमी बँकेत जाण्याची गरज राहणार नाही.

क्रिकेट विश्वात खळबळ! IPL सुरु असतानाच ‘या’ दिग्गज खेळाडूचा धक्कादायक निर्णय; महत्वाचं कारण समोर

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना हे कार्ड मिळेल. या कार्डची मुदत तीन वर्षांची असेल. या कर्डवरुन शेतकऱ्यांना दोनवेळा कर्ज घेता येईल. क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वित्तसंस्थांमध्ये जागेच्या सातबारा उताऱ्याची माहिती द्यावी लागणार आहे.

या कार्डमध्ये शेतकऱ्याच्या शेतीची सविस्तर नोंद असणार आहे. त्याने मागील वर्षी कोणते पीक घेतले. किती कर्ज घेतले, त्यातील किती फेडले तसेच किती बाकी आहे. नव्याने कोणते पीक घ्यायचे आहे. याची माहिती या कार्डमध्ये असणार आहे. तर शेतकऱ्याच्या कर्जाची पीकनिहाय वार्षिक मर्यादा त्यावरुन ठरेल. तेवढ्या मर्यादेचे कर्ज त्याला कार्ड दाखवले की मिळणार आहे.

EPFO Salary Limit – आता हातात सॅलरी कमी आली तरी नोकरदारांनाच होणार मोठा फायदा; कसे ते वाचाच

जेवढी मर्यादा आहे त्याचे दोन विभाग करुन एका वर्षात त्याला दोन वेळा कर्ज घेता येईल. दरम्यान, मागील कर्ज फेडली की त्याला पुढील वर्षी कर्ज मिळू शकणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.