Take a fresh look at your lifestyle.

‘एफडी’ वर मिळणार आता पूर्वीपेक्षा अधिक फायदा; ‘या’ बँकांनी वाढविले ठेवींवर व्याजदर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : सुरक्षित भविष्य व बचतीच्या दृष्टीने पैसे फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवींवर ठेवण्यात येतात. अनेकदा दीर्घ मुदत ठेवींवर जास्त व्याजदर मिळते, परंतु नुकतेच भारतातील दोन मोठया बँकांनी सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. या दोन बँकांमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया व इंडियन ओव्हरसीज बँक यांचा समावेश आहे.

बंडाच्या निर्णयाला आधार नाही! शरद पवारांकडून बंडखोरांना आव्हान

या दोन्ही बँकांनी दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. नवीन व्याजदरांबद्दल माहिती ग्राहक संबंधित बँकांच्या संकेतस्थळावरून प्राप्त करू शकतील. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवर ०.०५ टक्के ते १ टक्क्यांपर्यंत वाढ केली असल्याने ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेला सावकार बँक म्हणून ओळखल्या जाते तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही १११ वर्षे जुनी बँक असल्याने या बँकांच्या ग्राहकांची संख्या चांगली आहे. दरम्यान १२ जुलै रोजी नवे व्याजदर ग्राहक या दोन्ही बँकाच्या संकेतस्थळावर तपासू शकतात.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.