Take a fresh look at your lifestyle.

अखेर ठरले, पालघर साधू हत्याकांडाची चौकशी सीबीआय करणार; राज्य सरकारची स्वीकृती

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरात कोरोनाचा फैलाव होत असताना पहिल्यांदा भारतात या विषाणूजन्य आजाराचा शिरकाव नुकताच त्यावेळी झाला होता. याच काळात पालघर येथील साधूंची निर्घृण हत्या करण्याचे प्रकरण घडले होते, त्यामुळे संपूर्ण देशभरातून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. यावेळी राज्य तसेच देशभरात लॉकडाऊनची स्थिती होती, तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. यावेळी हे प्रकरण थंडबस्त्यात गेले होते, पोलिसांची सर्व शक्ती कोरोना दरम्यान कर्तव्यावर लागली असताना या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने केली होती.

‘एनआयए’चे मिशन काश्मीर; अनेक ठिकाणांवर छापे

आता हे प्रकरण नव्याने तपास प्रक्रियेत येणार असून राज्य सरकारने सदर प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याला परवानगी दिली आहे, याकरिता सरकारतर्फे प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आले आहे. या प्रतिज्ञा पत्रानुसार सीबीआयद्वारे चौकशीस महाराष्ट्र शासनाची पूर्ण परवानगी असून यावर कुठलाही आक्षेप नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील ‘या’ सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका; परवाना केला रद्द

सविस्तर वृत्त असे की, लॉकडाऊन दरम्यान सुशीलगिरी महाराज, कल्पगिरी महाराज तसेच वाहन चालक निलेश तेलगडे हे महाराष्ट्रातून सुरतला वाहनाने निघाले असता गडचिंचिल गावातील जमावाने या साधूंना व चालकाला बेदम मारहाण केली होती यामध्ये साधूंचा मृत्यू झाला होता. सदर बातमी वाऱ्यासारखी फैलली व जनमानसात आक्रोश उत्पन्न झाला होता. नेमक्या काही तासांतच देशभरातून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. भाजप सुरुवातीपासून महाविकास आघाडी सरकारला या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी या करिता पाठपुरावा करत होता. अखेर आता शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकरणी सीबीआय चौकशीला हिरवी झेंडी दाखविल्याने खरे आरोपी व प्रकरणामागचे नेमक्या कारणांची शहानिशा होण्याची शक्यता आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.