Take a fresh look at your lifestyle.

अखेर शिंदे-ठाकरे गटाची नावं ठरली; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटामध्ये पक्षचिन्ह मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं.

दिवाळीपूर्वीच डाळी महागल्या; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता

दरम्यान, शिंदे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायापैकी एकही चिन्ह त्यांना मिळालं नाही. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे. यावर आता निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार; उद्धव ठाकरे थेट मोदींना भिडणार?

शिंदे गटाला आज चिन्ह मिळणार

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलेली मुदत संपली आहे. दोन्ही गटांनी निवडणूक चिन्ह आणि नावांवरती तीन पर्यायाचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. शिवसेनेकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि तिसरा धगधगती मशाल हे 3 चिन्ह पाठवली होती. तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी नावं सेनेनं निवडणूक आयोगाकडे पाठवली होती.

संजय राऊतांना दिलासा नाहीच; सुनावणी पुन्हा लांबणीवर

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या गटाला काल ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

ऑन धिस टाईम मीडिया आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर आणि

इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ON THIS TIME (OTT) यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leave A Reply

Your email address will not be published.