Take a fresh look at your lifestyle.

Lunar Eclipse 2022 : सोमवारी होणाऱ्या चंद्रग्रहणाची अपेक्षित वेळ आणि लाईव्ह स्ट्रिम कसे पाहाल? जाणून घ्या

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Lunar Eclipse 2022 या वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण सोमवारी १६ मे २०२२ रोजी म्हणजेच आज लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यासाठी भारतात सुतक काल लागू होणार नाही. कालनिर्णयमध्येही चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने नियम आणि विधी पाळू नये असे म्हटले आहे. धार्मिक शास्त्रांत चंद्र ग्रहण हे अशुभ मानले आहे.

घाई करा! सोनं तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त! आता 3 महिन्यातील सर्वात कमी दर

आणि ते दुपारी 12.20 पर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी हे पूर्ण चंद्रग्रहण असेल.

लाइव्ह स्ट्रीम कसे पाहाल?

हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022)भारतात दिसणार नाही परंतु आपण नासाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्याचे लाईव्ह स्ट्रिम पाहू शकता. NASA त्याच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच त्यांच्या YouTube चॅनेलवर देखील कार्यक्रमाचे प्रसारण करणार आहे.

कुठे दिसणार चंद्रग्रहण?

2022 सालचे पहिले चंद्रग्रहण दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागांव्यतिरिक्त युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

चंद्रग्रहण कशामुळे होते?

संपूर्ण चंद्रग्रहणात(Lunar Eclipse) पृथ्वी पूर्णपणे चंद्र आणि सुर्याच्या मध्ये येते, यामध्ये पृथ्वी चंद्राला पूर्णपणे व्यापते. या ग्रहणात चंद्राचा रंगही लाल होतो आणि त्यावर डागही दिसतात, ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण चंद्रग्रहण हे सर्वात प्रभावी मानले जाते. 6 मे रोजी होणारे हे चंद्रग्रहण या वर्षातील पहिले चंद्रग्रहण असेल आणि दुसरे 8 नोव्हेंबर रोजी होण्याची अपेक्षा आहे.

बापरे! शिखर धवनला रबाडाकडून मारहाण? पाहा व्हायरल Video

ब्लड मून म्हणजे काय?

चंद्रग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र पूर्ण ग्रहण असतो. म्हणजेच पूर्ण चंद्रग्रहण असेल तर ते चंद्रग्रहण ब्लड मूनसारखे दिसते. ब्लड मूनची घटना खूप सुंदर आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण झाल्यास पृथ्वीची सावली चंद्राच्या प्रकाशाला झाकून टाकते. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणावर आदळतो आणि चंद्रावर पडतो तेव्हा तो अधिक उजळ होतो. अशा स्थितीत जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे ते आणखी उजळ दिसते म्हणजे गडद लाल दिसते. खगोलशास्त्रात या घटनेला ब्लड मून म्हणतात.

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ‘हा’ पक्ष देणार एका कुटुंबाला एकच तिकीट!

Comments are closed.