Take a fresh look at your lifestyle.

फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 11 मिळतोय फक्त ‘इतक्या’ रुपयांत; जाणून घ्या ऑफरबद्दल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : दिवाळीत अनेक ऑनलाइन शॉपिंग अ‍ॅप्सची विक्री सुरू आहे. या सेलमध्ये अप्रतिम ऑफर्स दिल्या जात आहेत. 11 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर Big Diwali Sale 2022 देखील सुरू झाला आहे. हा सेल आणखी दोन दिवस चालणार आहे. या सेलमध्ये तुमच्या खिशाला परवडेल अशा अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, पण जर तुम्हाला शेवटच्या दोन सेलमध्ये ते मिळू शकले नाही, तर हा सेल तुमच्यासाठी फोन मिळवण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

पाऊडदौना(पांढरी) येथे १ कोटी ३८ लक्ष निधीच्या विकासकामांचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

या सेलमध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या स्मार्टफोनवर सूट मिळण्याची संधी आहे. कारण Flipkart स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना विशेष सवलत देत आहे. या ग्राहकांना 5 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदीवर 10 टक्के सूट मिळते. याशिवाय, नॉन-ईएमआय व्यवहारांवर एक हजार 250 रुपयांची कमाल सूट आणि ईएमआय व्यवहारांवर एक हजार 750 रुपयांची सूट दिली जात आहे.

आमगांव नगरपरिषद मधील अनेक प्रभागात विकासकामांचे आमदार कोरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

फ्लिपकार्ट आपल्या दिवाळी सेलमध्ये सवलत, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरसह केवळ 17 हजार रुपयांमध्ये iPhone 11 ऑफर करत आहे. Apple iPhone 11 (Red) 4GB/64GB व्हेरिएंट 9 हजार 910 रुपयांच्या सवलतीनंतर 33 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. SBI आणि Kotak कार्डांवर 10 टक्के सूट देऊन, नॉन-ईएमआय व्यवहारांसह 32 हजार 740 रुपये आणि ईएमआय व्यवहारांसह 32 हजार 240 रुपये मोजावे लागतील. तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करत नसल्यास, तुम्हाला या किमतीत फोन मिळू शकतो.

कोल्हापुरात ‘कर्नाटक भवन’ उभे करू देणार नाही; संजय पवारांचा इशारा

यावर, तुम्ही पुन्हा SBI किंवा कोटक बँकेच्या ऑफरमधून 10 टक्के डिस्काउंटवर क्लेम करू शकता आणि अशाप्रकारे तुमच्या iPhone 11 ची किंमत 15 हजार 840 रुपयांपर्यंत खाली आणू शकता. परंतु, समजा तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर 6 हजार 700 रुपयांची एक्सचेंज किंमत मिळाली, तर तुमच्यासाठी Apple iPhone 11 ची प्रभावी किंमत बँक ऑफर आणि सर्व डिस्काउंटसह 26 हजार 40 रुपये असेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.