Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानमध्ये पुराचा कहर; आतापर्यंत तब्बल १००० जणांचा मृत्यू

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

पाकिस्तान : पाकिस्तानात मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे. पाकिस्तानात शतकाचा पूर आला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे पूर आला असून आतापर्यंत लहान मुलांसह तब्बल 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.

‘या’ शहरात रिक्षाप्रवास महागला; 1 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या खिशाला बसणार कात्री

पाकिस्तानात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या म्हणण्यानुसार, सिंध प्रांतात 14 जूनपासून देशात पुरामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. तसेच कराची, पंजाब आणि बलुचिस्तानमध्येही परिस्थिती फार वाईट आहे.

नितीन गडकरींचे आगामी निवडणुकी संदर्भात सूचक विधान

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील 70 टक्के भागाला पुराचा फटका बसला आहे. याचा सर्वाधिक फटका सिंध प्रांताला बसला आहे. या महापुरामुळे सुमारे तीन कोटी लोकांचे संसार वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.