Flour mill : नमस्कार मित्रांनो शासनाकडून महिलांसाठी घरगुती व्यवसाय सुरू करणे साठी विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये महिलांना मोफत पिठाची गिरणी यासाठी देखील अनुदान दिले जाते.
घरगुती पिठाची गिरणी Flour Mill साठी देखील महिला अर्ज करू शकता. शिवाय या पिठाच्या गिरणीतून महिलांना एक छोटे खाणी व्यवसाय सुरू करता येईल.
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाकडून पिठाची गिरणी, शिलाई मशीन यासारख्या विविध योजनांसाठी अर्ज मागवले जातात. पिठाच्या गिरणीतून व्यवसाय Business करून महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. तसेच आपल्या घरात उत्पन्नाचे एक नवीन स्रोत निर्माण करू शकतात.
पिठाच्या गिरणी साठी असा करा अर्ज
जिल्हा परिषदे कडून अशा प्रकारच्या योजनांसाठी अर्ज मागविले जातात सध्या जर तुमच्या जिल्हा परिषदेमध्ये पिठाच्या गिरणी साठी अर्ज सुरू असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करू शकतात.