Take a fresh look at your lifestyle.

फुटबॉल विश्वचषकामुळे तामिळनाडू राज्य ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू; नेमक्या ‘या’ कारणाने चर्चेत

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरातील फुटबॉल प्रेमी सध्या ‘फिफा विश्वचषक २०२२’ चा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. यावेळी फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन मध्य आशियातील देश कतारमध्ये करण्यात आले आहे, या आयोजनाकरिता कतारने ओतलेला अमाप पैसा मध्यंतरी चर्चेचा मुद्दा ठरला होता. आता या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने भारतातील तामिळनाडू राज्य आर्थिक जगताचे आकर्षण बनले आहे. याचे नेमके कारण म्हणजे तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाणत होणारे अंड्याचे उत्पादन होय. सध्या कतारला भारतातून मोठ्या प्रमाणात अंड्याची निर्यात केली जात असल्याची माहिती आहे.

अर्थविश्व : भारतावर जागतिक मंदीचा प्रतिकूल परिणाम होणार नाही; सेवा व तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचा विश्वास

भारतात तामिळनाडू राज्याचा अंडी उत्पादनात अव्वल क्रम लागतो. या राज्यात एकूण १,१०० पोल्ट्री फॉर्म आहे, त्यामध्ये एकट्या नमक्कल जिल्ह्यात ७०० पोल्ट्री फॉर्म आहेत. नमक्कल मध्ये अंड्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादन केल्या जाते, साधारणपणे अंदाजानुसार नमक्कल जिल्ह्यात दररोज ६० दशलक्ष इतक्या अंड्यांचे उत्पादन घेतले जाते. भारतातून कतारला चेन्नई अथवा थूथुकुडी बंदरमार्गे अंडी निर्यात केली जाते. यापूर्वी संपूर्ण महिन्यात कतार येथून १ कोटी अंड्यांची मागणी केली जात होती, मात्र फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन बघता मागील दोन महिन्यांपासून महिन्याला अडीच कोटी अंड्याची मागणी कतार भारताकडे करत असल्याची माहिती आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय; जागतिक बँकेला सहकार्याची साद

याआधी तुर्कस्थान मधून कतारला अंडी निर्यात करण्यात येत होती, मात्र रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम महागाईच्या स्वरूपात झाल्याने तुर्कस्थानमधील अंडी महागल्याची स्थिती आहे. त्यामुळे भारताकडून मोठ्या प्रमाणात कतार मध्ये अंडी निर्यात केली जात आहे. याकारणाने मोठ्या प्रमाणात अंडी व्यवसायातून आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. तामिळनाडू राज्यातून भारतात पश्चिम बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये अंडी निर्यात केली जाते. मात्र यावेळी थेट देशाबाहेरून अंड्याला मागणी वाढल्याने, भारतात अंड्यांच्या दरांवर परिणाम जाणवत आहे. इथे विशेष बाब म्हणजे तामिळनाडू राज्यातून केवळ कतार मध्येच नव्हे तर युरोपातील देशांकडून अंड्याची अधिक मागणी होत आहे, यामुळे हे राज्य जागतिक स्तरावर अंडी उत्पादनाच्या बाबतीत चांगलेच प्रकाशझोतात आले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.