Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; उर्जा मंत्री राऊत यांनी केली ‘हि’ घोषणा

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या विज बिलाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. मागील कित्येक महिन्यापासून कृषीपंपाचे वीजबील माफ करण्याबाबत सरकारकडे मागणी करण्यात येत होती. उन्हाची तीव्रता वाढत असताना शेती पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. उष्णता वाढत असतानाच वीज मंडळाने वीज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी चिंतेत होते.

कृषी पंपाची वीज न तोडण्याचे आवाहन
दरम्यान आज उर्जा मंत्री राऊत यांनी पुढील तीन महिेने कृषी पंपाची वीज न तोडण्याचे आवाहन केले आहे. ते आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उर्जा मंत्री राऊत पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हाती पिक येईपर्यंत पुढील तीन महिने वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही. तसेच ज्यांचे विज बिले थकीत आहेत त्यांनी त्वरित दुरूस्ती करून घेण्याचेही ते म्हणाले.

दिवसा कृषीपंपाना पाणी देण्यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची समिती नेमली
उर्जा मंत्री  राऊत यांच्या या घोषणेने तुर्तास शेतकऱ्यांनी दिलासा मिळाला आहे. मागच्या आठवड्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी विज बिलासंदर्भात राज्यव्यापी आंदोलन उभारले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून उर्जामंत्री राऊत यांनी वाढीव विज बिलाबाबत तालुका स्तरावर शिबीरांचे आयोजन करण्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. याचबरोबर दिवसा कृषीपंपाना पाणी देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत त्यांनी तज्ञ अधिकाऱ्यांची समितीही नेमली आहे. त्यामुळे उर्जा मंत्री राऊत यांनी घेतलेल्या या निर्णयांचा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.