Take a fresh look at your lifestyle.

पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडच्या मातीत मिळवला मालिकाविजय; ३३३ धावांचा उभारला डोंगर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

IND vs ENG, 2nd ODI Women Cricket : भारतीय महिलांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (Womens ODI) इंग्लंडचा 88 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे 1999 नंतर पहिल्यांदाच म्हणजेच 23 वर्षात पहिल्यांदाच भारतीय महिलांनी (Indian Womens Cricket Team) इंग्लंडच्या भूमीवर मालिका जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 333 धावांचा डोंगर उभा केला. (IND vs ENG)

त्यानंतर इंग्लंडचा डाव 245 धावांवर आटोपला आणि 88 धावांनी सामना जिंकला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 143 धावा केल्या आहेत. भारतीय महिलांनी मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला होता.

दूध-दह्याचे दर वाढण्याची शक्यता; ‘ही’ कंपनी मोठा निर्णय घेणार!

दुसऱ्या वनडेत इंग्लंडने (ODI Cricket) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांनी इंग्लंडचा हा निर्णय चुकीचा ठरवला आणि अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. शेफाली 8 धावा करून बाद झाली असली तरी स्मृती मंधानाने 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरची (Harmanpreet Kaur) 143 धावांची नाबाद खेळी संस्मरणीय ठरली. हरलीन देवोलनेही 58 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली. या तीन डावांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 334 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.