Take a fresh look at your lifestyle.

VIDEO: शिपाई ते सचिव सर्वांचं औक्षण, यशोमती ठाकूर यांनी घेतला कर्मचाऱ्यांचा भावुक निरोप

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – VIDEO मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि सत्तेतून पायउतार झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेवर आले आहे.

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना ‘या’ प्रकरणात CBI कडून क्लिन चीट

दरम्यान, सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर ठाकरे सरकारमधील महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाकूर यांनी सर्व स्टाफचा भावुक निरोप घेतलेला हा व्हिडीओ आहे.

मुंबईतील मंत्रालयातील स्टाफचा त्यांनी निरोप घेतला. यावेळी त्यांनी शिपाई, सुरक्षा रक्षक, कार्यालयीन कर्मचारी तसंच सचिव या सर्वांचं स्वत: औक्षण केलं, तसंच त्यांना शाल पांघरत त्यांचा सत्कार केला. आता मंत्री म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी नातं राहिलं नसलं तरी ऋणानुबंध आयुष्यभर राहतील अशी भावना ठाकूर यांनी व्यक्त केली.

एकनाथ शिंदेंना खरंच सर्वात मोठा झटका? व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला

यशोमती ठाकूर यांनी फेसबुक पोस्टसह हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे असणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन’ असे ठाकूर यांनी सांगितले.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Comments are closed.