Take a fresh look at your lifestyle.

गडकरींचा मोठा खुलासा; चार मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांमध्ये जे पाहिलं ते भयावह होतं

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी ४ सप्टेंबर रोजी कार अपघातात दुःखद निधन झालं. त्यानंतर देशभरात पुन्हा एकदा ‘रस्ता सुरक्षा’ या विषयावर चर्चेला उधाण आलं आहे. सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट घातला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे हेही कारण असावे, अशी चर्चा आहे. कारण सीट बेल्ट लावला असता तर समोरच्या सीटवर आदळले नसते. त्यामुळेच आता कारमधील प्रवाशांनी केवळ पुढच्याच नव्हे, तर मागच्या सीटवरही सीट बेल्ट लावणं आवश्यक असल्याचं अधोरेखित केलं जात आहे.

उद्धव ठाकरेंना ‘त्या’ कामाची शिक्षा भोगावी लागणार; नवनीत राणांचा इशारा

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अलीकडेच एका कार्यक्रमात यावर भाष्य केलं आणि प्रत्येकानं सीट बेल्ट घालण्याचं आवाहन केलं. याबाबत सर्वसामान्य नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं त्यांनी व्यक्त केली. IAA Global Summit 2022 या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

देशातील सर्व नागरिकांनी रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावा, उदासीनता दूर करून मानसिकता बदलली पाहिजे, असे नितीन गडकरी म्हणाले. ‘मी चार मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून प्रवास केला आहे. मी त्यांची नावे सांगणार नाही. पण मी त्यांच्या गाड्यांमध्ये जे पाहिले ते भयावह होतं. मी ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. माझ्या लक्षात आले की बेल्टला एक क्लिप जोडलेली आहे. त्याचं कारण म्हणजे सीट बेल्ट लावला नसला तरी बीप बीप आवाज येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. मी चालकांना फटकारले आणि क्लिप काढल्या. हे पाहिल्यानंतर मी अशा क्लिपच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घातली आहे.’ असे गडकरी यांनी सांगितले.

ही घाई बरी नाही! अतिवेगाने वाहन चालविल्याने साडे तीन वर्षात ३३ हजार ६०४ जणांचा मृत्यू

नितीन गडकरी यांनी सायरस मिस्त्री यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘ते माझे खूप चांगले मित्र होते. त्यांच्या निधनानं देशाला मोठा धक्का बसला आहे, असं म्हणत देशात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात आणि त्या अपघातांमध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यातील ६५ टक्के मृत व्यक्ती १८ ते ३४ वयोगटातील आहेत. एकंदरीत, विशेषतः तरुणांनी आणि सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.