Take a fresh look at your lifestyle.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमुक्त प्रवास करता येणार; राज्य सरकारचा निर्णय

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गणेशोत्सवास (Ganesh Chaturthi 2022) आता नेमके काही दिवस उरले असताना लवकरच लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रभर या उत्सवाची व्याप्ती मोठी असून गणेशोत्सवादम्यान यात्रेकरू विविध गणेश मंदिर क्षेत्री प्रवास करतात. राज्य सरकारने (Maharashtra Government) यंदा कोकण विभागात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांना आनंददायक बातमी दिली असून, या काळात कोकणात प्रवास करणाऱ्यांना टोलमुक्त (Toll Tax Free) प्रवास करता येणार आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

दिनांक २७ ऑगस्टपासून टोलमुक्त प्रवास सेवा राज्य सरकारतर्फे सुरु होणार असून, याकरिता नागरिकांना प्रवासाकरिता स्टिकर्स, पासेस इत्यादी विविध सरकारी विभागांकडून प्राप्त करावे लागणार आहे. सध्या मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ६६, मुंबई – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग ४८ व कोकणातील मार्गावरील टोल केंद्रांवर नागरिकांना टोलमुक्त म्हणजेच मोफत प्रवास करता येणार आहे. या संबंधीचे पासेस वाहतूक पोलीस चौकी, पोलीस स्टेशन, परिवहन विभाग कार्यालय, विविध पोलीस चौकी इत्यादी जागी मिळणार आहेत.

अनिल देशमुखांची प्रकृती अचानक बिघडली; उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल

पासेस वर ‘कोकण गणेशोत्सव – २०२२ गणेश दर्शन पथकर माफी पास’ अशा मजकुराचा उल्लेख नमूद केलेला राहणार आहे. सदर टोलमुक्त प्रवास सेवा ११ सप्टेंबरपर्यंत देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त गाडी क्रमांक, मालकाचे नाव, मोबाईल क्रमांक, प्रवासाची तारीख, जाण्यायेण्याचा मार्ग इत्यादी बाबींचा देखील पासवर उल्लेख केलेला असेल. ही पास स्टिकर्स म्हणून गाडीला लावावी लागणार आहे, ज्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गावर टोलमुक्त सेवेचा लाभ घेता येईल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.