Take a fresh look at your lifestyle.

“गर्जा महाराष्ट्र माझा” गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : गीत संगीत मनुष्याच्या मनाचे नैराश्य घालवत उत्साहाची निर्मिती करते, जर ते गीत आपल्या देशाचे, राज्याचे किंवा महान भारतीय संस्कृतीचे यशोगान करणारे असेल तर ते ऐकताना आपसूकच मन तल्लीन होऊन जाते. महाराष्ट्र ही संतांची व थोर पुरुषांची भूमी असलेले राज्य आहे, या राज्याचा इतिहास अनेक भव्यदिव्य अशा कर्तृत्वांनी ओतप्रोत आहे. मराठी संस्कृती, शिवशंभु सारख्या नरवीरांनी इथल्या मातीसाठी दिलेले महान योगदान, संतांनी निर्माण केलेली आदर्श मूल्ये व राज्यातून वाहणाऱ्या नद्यांचे समर्पक वर्णन शाहीर साबळे यांनी आपल्या लेखणीतून गीताच्या माध्यमातून केले आहे. हे गीत म्हणजे, “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” होय. या गीताला आता राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे, याची घोषणा राज्याचे वन तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली आहे.

आशिष शेलार ‘या’ क्रीडा मंडळाच्या खजिनदार पदी नियुक्त; ९६२९ कोटी मालमत्ता खजिन्याची चावी सांभाळणार

मुळात हे गीत साडेतीन मिनिटांपर्यंत चालणारे आहे, परंतू गीतातील केवळ दोन कडव्याला राज्यगीत म्हणून अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. सध्या कुठल्या दोन कडव्यांचा यामध्ये समावेश असणार आहे याबाबत खुलासा करण्यात आला नाही. लवकरच ते निश्चित करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरचा पगार व निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी, मात्र यंदा बोनस नाहीच!

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ” हे गीत उत्साह वाढविणारे असून दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र अशी भावना या गीतामध्ये आहे त्यामुळे गीताचे दोन कडवे घेत त्याला राज्यगीत म्हणून घोषित करण्यावर सध्या विचार सुरु आहे.”

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.