Take a fresh look at your lifestyle.

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गौतम अदानी ‘मातोश्री’वर; राजकीय चर्चांना उधाण

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी काल पोहोचले. जवळपास तासभर दोघांमध्ये चर्चा सुरू होती. गौतम अदानी यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे कारण किंवा त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असतानाच झालेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रात मुंबईसह पुणे, मालेगावमध्ये ED आणि ANIचे छापे; २० जणांना अटक

अलीकडेच, गौतम अदानी यांनी LVMH Moet Hennessy – Louis Vuitton सह-संस्थापक आणि अध्यक्ष बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, गौतम अदानी हे आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत फक्त इलॉन मस्क त्याच्या पुढे आहेत.

धक्कादायक! दरदिवशी राज्यात सात शेतकरी आत्महत्या

सत्तांतर –

यंदा महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे अल्पमतात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.