Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! तरुणाने घेतला गळफास; बातमी कळताच शेजारच्या तरुणींनही संपवले जीवन

0
ओटीटी न्यूज नेटवर्क
नागपूर – तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर त्याला पाहून शेजारच्या तरुणीने सुद्धा गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सावनेर तालुक्यात घडली आहे. या घटनेने संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका प्रेमी युगुलाने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर समोर आलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण ?
सावनेरच्या माताखेडी किल्ली परिसरात आकाश प्रकाश लालबागे या 22 वर्षाच्या तरुणाने घरात नायलॉनच्या दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. या घटनेची बातमी परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला होता.
ही कार्यवाही सुरु असतानाच शेजारच्या तरुणीने सुद्धा ओढणीने गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच उपस्थितांना तरुणीच्या घराकडे गर्दी केली. तिला लगेच खाली उतरवून रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. अचनाक घडलेल्या या प्रकाराने परिसरातील वातारण शोक पसरला आहे. तोच विविध प्रकारच्या चर्चांना पेव फुटला आहे.
दोन दिवसांपूर्वीच घडली अशीच घटना 
दोन दिवसांपूर्वी नागपूर येथील कामठी तालुक्यात प्रेमी युगुलाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशा घटनेमुळे नागपूर हादरले आहे. वरील घटनेत पोलीस तपास करत आहेत. सध्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
Leave A Reply

Your email address will not be published.