Take a fresh look at your lifestyle.

‘काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आमदार बनवतो’ चंद्रकांत पाटलांची थेट ऑफर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

कोल्हापूर – कोल्हापूरच्या उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं गेल्यावर्षी निधन झालं होतं. त्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त झाली होती. दरम्यान आता याच जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांबाबत नितिन गडकरी यांची जबरदस्त घोषणा; कार-बाईकचालकांमध्ये आनंदाचे वातावरण

आज कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने (bharatiya janata party) जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी थेट काँग्रेसलाच ऑफर दिली आहे. ‘काँग्रेसचा उमेदवार भाजपला द्या, आम्ही आमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावतो आणि जयश्री जाधव यांना आमदार करतो’ असा खळबजनक प्रस्ताव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bharatiya janata party leadership) यांनी काँग्रेसलाच(bjp congress news) दिला आहे. विशेष म्हणजे अजूनही काही तास शिल्लक असून यावर विचार करून निर्णय घ्या असं आवाहनही पाटील यांनी केलय.

दरम्यान, यावेळी त्यांनी जीएसटी तसेच पेट्रोल डिझेलसा इतर विषयांवर देखील भाष्य केलं. दरम्यान, पेट्रोल डिझेल जीएसटीमध्ये आणायला अजित पवार यांचा विरोध आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा फटका बसला असून जीएसटीमध्ये आणल्यास 30 रुपयांनी इंधन स्वस्त होईल, असा दावाही पाटील यांनी यावेळी केला.

ICICI बँकेने वाढवले FD व्याजदर, आजपासून नवीन दर लागू

आयपीएलमधून मिळणार टीम इंडियाला नवीन कॅप्टन; जाणून घ्या कोण आहे ‘हा’ क्रिकेटपटू?

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.