Take a fresh look at your lifestyle.

‘ग्लोबल टिचर’ डिसले गुरुजींच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ‘सीईओ’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविणार अहवाल

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

सोलापूर : ‘ग्लोबल टिचर'(Global Teacher) या ओळखीने नावरुपास आलेले जिल्हा परिषद शिक्षक (Zilla Parishad Teacher) रणजितसिंह डिसले यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचा विचार करता नुकताच त्यांचा राजीनामा संबंधित विभागाकडे दाखल केला होता. डिसले यांनी राजीनामा देताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भेटीकरिता बोलावले होते. त्यामुळे या प्रकरणावर योग्य तो निर्णय चौकशीअंती होईल असा विश्वास निर्माण झाला होता, परंतु संबंधित प्रकरणात डिसले गुरुजी यांच्यावरील कारवाई अटळ असल्याचे चित्र आहे.

९४१ कोटींच्या कामांना दिली स्थगिती; एकनाथ शिंदेचा अजित पवारांना दणका

नेमके वृत्त असे की, वर्ष २०१७ ते २०२० या तीन वर्षाच्या काळात रणजितसिंह डिसले प्रतिनियुक्तीवर होते, परंतु ते या काळात शाळेवर गैरहजर होते. दरम्यान या कालावधीमध्ये त्यांनी मुख्याध्यपकांचा(Head Master) यूजर आईडी व पासवर्ड वापरून वेतन घेतले आहे. हा संपूर्ण प्रकार खळबळजनक असून चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या दोन्ही समित्यांच्या अहवालात डिसले गुरुजी दोषी आढळले आहे. याव्यतिरिक्त शाळा प्रशासनाला कुठलीही पूर्वकल्पना न देता राज्यपालांना शाळेत भेटीकरिता आमंत्रित करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कॉल न स्विकारणे इत्यादी बाबींमुळे संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांचा डिसले गुरुजींवर रोष कमालीचा वाढलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! शेतीचे नुकसान झाल्यास सरकार देणार ‘इतकी’ रक्कम

आता थेट कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद सीईओ, चौकशी समितीचा अहवाल शिक्षण सचिव (Education Secretary) व शिक्षण आयुक्त (Education Commissioner) यांना पाठविणार आहे, त्यामुळे डिसले गुरुजींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान गटशिक्षणअधिकारी यांच्याकडे डिसले गुरुजींनी दिलेला राजीनामा मान्य होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणार की त्यांच्या चुका माफ होणार हे येत्या काळात कळेलच. अद्याप डिसले गुरुजी चांगलेच अडचणीत असल्याचे दिसत आहे, कारण त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहे व शेवटी कायदा सर्वांना समान असतो.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळविण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.