नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून पशुपालक शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे.
Ahmahabms goat farming subsidy : नाविन्यपूर्ण योजनेमध्ये दुधाळ गाय वाटप, शेळीपालन व्यवसायासाठी 10 शेळ्या व एक बोकड वाटप योजना तसेच मेंढी पालन व्यवसायासाठी दहा मेंढ्या व एक मेंढा वाटप योजना सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये गाईचे शेड बांधणे, शेळ्या-मेंढ्या साठी शेड उभारणी त्यासाठी लागणाऱ्या प्रकल्प खर्चा वरती देखील 75 % अनुदान दिले जाते नाविन्यपूर्ण योजनेसाठी सध्या राज्यात अर्ज सुरू आहेत.
Ahmahabms goat farming subsidy : नाविन्यपूर्ण योजना साठी जवळपास 74 हजार रुपये अनुदान दिले जाते. प्रकल्प खर्चाच्या 75 टक्के अनुदान अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांना दिले जाते. तसेच जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के अनुदान दिले जाते.
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून पशुपालन शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना अर्ज करणे सोयीचे व्हावे यासाठी अँड्रॉइड ॲप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे.
योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतीक्षा यादी व अंतिम लाभार्थी याद्या देखील तयार करण्यात येणार आहे.