Take a fresh look at your lifestyle.

Gold Price सोन्याची झळाळी उतरली; तिसऱ्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सोने खरेदी करण्याकडे हल्ली सर्वांचाच कल पाहायला मिळतो. कारण भविष्याच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोने खरेदी. जर तुम्ही देखील सोने खरेदी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आज सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीमधील घसरण सुरुच आहे. आज गुरुवार दिनांक ७ जुलै २०२२ रोजी प्रमुख सराफा बाजारात सोन्याच्या भावात ४५० ते ७५० रुपयांची घसरण झाली. आज सलग तिसऱ्या सत्रात सोनं स्वस्त झाले शिवाय, एमसीएक्सवर सोन्याचा भाव १०० रुपयांनी वधारला.

‘मातोश्री’वरून बोलावलं तर एकनाथ शिंदेंसह जाणार; सेनेच्या ‘या’ बंडखोर आमदाराचं वक्तव्य

आज दिल्लीतील सराफा बाजारात सोनं ४२७ रुपयांनी स्वस्त झालं. सोन्याचा दर प्रती १० ग्रॅम ५२,७९५ रुपये इतका खाली आलं असून चांदीच्या किमतीत १३४ रुपयांची घसरण झाली आहे. मध्यंतरी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२५४ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५०,६०७ रुपयांपर्यंत खाली आला असून त्यात १०७ रुपयांची घसरण झाली. त्यापूर्वी बुधवारी सोन्याचा भाव ५०,५०० रुपयांवर स्थिरावला होता. आज एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ५७,१७० रुपये इतका वाढला असून त्यात ४४४ रुपयांची वाढ झाली.

शिंदे सरकारचा राऊतांना दणका, किरीट सोमय्यांना दिलासा

यापूर्वी मंगळवारी सोन्याचा भाव ८०० रुपयांनी कमी झाला होता तर चांदी १,५०० रुपयांनी स्वस्त झाली. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार बुधवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,२९८ रुपये होता. एक किलो चांदीचा भाव ५६,४४९ रुपये इतका होता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.