Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today घाई करा! सोनं तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त! आता 3 महिन्यातील सर्वात कमी दर

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – Gold Price Today गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. विशेष म्हणजे सातत्याने या दरांमध्ये वाढ होत असून कमी होण्याचं नाव नाहीय. अशातच अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे.

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ‘हा’ पक्ष देणार एका कुटुंबाला एकच तिकीट!

दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये सोने-चांदीच्या किमतीत होणाऱ्या घसरणीचा फायदा भारतीय ग्राहकांना होतो आहे. लग्नसराईचा सीजन असूनही सोन्याचा दर अद्यापही तीन महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर आहे आणि केवळ एका आठवड्यात सोनं 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत स्वस्त झालं आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) शुक्रवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 0.03 टक्क्यांनी (Gold Price Today) घसरुन 50,158 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. या आठवड्यात सोने दरात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली आहे. आज सकाळी ट्रेडिंगच्या सुरुवातीला दर 50,067 रुपये होता त्यानंतर त्यात काहीशी वाढ झाली.

आसाममध्ये अचानक आला पूर! 25 हजार लोकांना फटका; तर भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू

मागील सत्रात सोन्याचा भाव 1.2 टक्क्यांनी खाली आला होता. मार्चच्या सुरुवातीला सोने दर 56 हजारांच्या जवळपास पोहोचला होता.

चांदीच्या दरातही घसरण –

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज MCX वर चांदीचा वायदे भाव 0.3 टक्क्यांच्या 0.3 टक्क्यांच्या (Silver Price Today) वाढीसह 58,920 रुपये प्रति किलोग्रॅम होता. याच्या मागील सत्रात चांदीच्या किमती 3.3 टक्के अर्थात जवळपास 2000 रुपयांनी खाली आल्या होत्या. आज चांदीचा ट्रेडिंग दर 58,954 रुपये प्रति किलोग्रॅम स्तरावर सुरू झाला. त्यानंतर या दरात काहीशी घसरण झाली.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! १ जुलैपासून ड्रायविंग लायसन्सच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर –

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

तपासा सोन्याची शुद्धता –

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सोने दरात घसरण का?

रशिया – युक्रेन संकटानंतर जगभरात सोन्याची मागणी वाढते आहे. गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. परंतु याचदरम्यान डॉलरचा दर वाढत असल्याने त्याच्या दबावाखाली गुंतवणुकदारांचा सोन्यामध्ये निराशा झाली. जागतिक बाजारात डॉलर सध्या 105 च्या जवळ आहे, जो 20 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर आहे. याशिवाय महागाईच्या सततच्या वाढत्या आकडेवारीमुळे गुंतवणुकदारांवर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.

रेशन दुकानदारांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय, उचललं मोठं पाऊल

Comments are closed.