Take a fresh look at your lifestyle.

सोनं खरेदीदारांना दिलासा! सोन्याचे दर घसरुन 50 हजारांखाली; जाणून घ्या नवे दर

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई  – गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात कमालीचा चढ उतार पाहायला मिळाला. मात्र, सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. अशातच, सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात चांगलीच घसरण (Gold Price Fall Today) झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी सोन्याच्या किंमती तब्बल 50 हजारांच्या खाली आल्या आहेत. मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत बुधवारी सकाळी 284 रुपयांनी वाढून 49,889 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सकाळी, एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर 50,120 वर उघडला आणि व्यवहार सुरू झाला. परंतु, वाढलेली विक्री आणि कमी मागणी यामुळे लवकरच दर 0.57 टक्क्यांनी घसरला आणि फ्युचर्सची किंमत 50 हजार रुपयांच्या खाली गेली.

वाह ! शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारची ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना; जाणून घ्या भन्नाट फायदे

अमेरिकन सेंट्रल बँक फेड रिझव्‍‌र्हचे (US Central Bank) नेते जेरोम पॉवेल यांनी महागाई नियंत्रणात आणण्याच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात परत तेजी येताना दिसत आहेत. तर विक्री बंद झाल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे देशांतर्गत सराफा बाजारावर दिसून आला आणि लग्नसराईतही सोन्याचा दर 50 हजारांच्या खाली आला आहे.

सोन्याच्या धर्तीवर आज सकाळी चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली. मल्टीकमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 518 रुपयांनी घसरून 60,338 रुपये किलो झाला. याआधी एक्सचेंजमध्ये चांदीची किंमत 60,752 वर उघडली आणि व्यवहार सुरू झाला. पण मागणी कमी झाल्याने आणि वाढलेली विक्री यामुळे काही काळानंतर फ्युचर्सचे भाव 0.85 टक्क्यांनी खाली आले आणि 60 हजारांच्या आसपास व्यवहार सुरू झाले.

ALERT! महाराष्ट्रातील तब्बल ‘इतक्या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

जागतिक बाजारातही घसरण दिसून आली

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज सकाळच्या व्यवहारात, अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत 1,809.58 डॉलर प्रति औंस होती, जी मागील किंमतीपेक्षा 0.28 टक्क्यांनी कमी होती. त्याच धर्तीवर, चांदीच्या दरातही घसरण झाली आणि स्पॉट किंमत 0.46 टक्क्यांनी घसरून 21.53 डॉलर प्रति औंस झाली. गेल्या महिन्यापर्यंत 72 हजारांच्या आसपास चांदीची विक्री होत होती.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.