Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, एक तोळ्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सोन्याच्या दरात (Gold Price Drop) आज पुन्हा घसरण झाली, मात्र चांदीचा दरात वाढ (Silver Price Hike) झाली आहे. सराफा बाजारात, 22 कॅरेट सोन्याची किंमत, ज्यामध्ये बहुतेक दागिने बनवले जातात ती 46,700 रुपयांच्या आसपास आहेत.

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

IBJA वेबसाईटच्या माहितीनुसार, तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) 51 रुपयांनी घसरून 51,038 रुपयांवर खुला झाला. त्याच वेळी, चांदीचा भाव 62,287 रुपयांवर उघडला. 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,038 रुपये आहे. काल सराफा बाजारात सोन्याचा भाव 51,089 रुपयांवर बंद झाला. आज दर 51 रुपयांनी घसरले.

आधार कार्डवरील फोटो आवडला नाही? या सोप्या प्रोसेसने सहज करा बदल

23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 50,834 रुपये होती. 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 46,751 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटची किंमत 38,279 रुपयांवर पोहोचली आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 29,857 रुपये होता.

सोने 999 (24 कॅरेट)- 51038 रुपये/तोळे

सोने 995 (23 कॅरेट) – 50834 रुपये/तोळे

सोने 916 (22 कॅरेट) – 46751 रुपये/तोळे

सोने 750 (18 कॅरेट) 38579 रुपये/तोळे

सोने 585 (14 कॅरेट) 29857 रुपये/तोळे

चांदी 999 – 62287 रुपये/किलो

चांदीचा दर सराफा बाजारात एक किलो चांदीचा दर 62,287 रुपये होता. काल चांदी 62,052 रुपयांवर बंद झाली. आज तो 235 रुपयांनी वधारला.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.