Take a fresh look at your lifestyle.

सोन्याची झळाळी उतरली; चांदीचा भावातही घसरण, तपासा आजचे दर

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – नेहमीप्रमाणेच सोने चांदीच्या दरातील चढ उतार सुरूच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावामुळे मंगळवारी सोने-चांदी दरात (Gold-Silver Price) मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. विशेष बाब म्हणजे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चांदीचा भाव 68000 हून खाली उतरला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा वायदे भाव 198 रुपयांनी कमी होऊन 51,373 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold Price Today) आहे. हा भाव 24 कॅरेट सोन्याचा आहे. याआधी सोन्याचा भाव बाजारात 51,342 च्या रेटवर ओपन झाला होता.

आताच खरेदी करा सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक स्प्लेंडर ; सिंगल चार्जमध्ये तब्बल १८० KM पर्यंत रेंज!

चांदीचा भावही उतरला –

MCX वर चांदीचा वायदे भावही सकाळी सुरुवातीच्या वेळेत घसरला होता. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर चांदी वायदे भाव 199 रुपयांच्या नुकसानासह 67,906 रुपये प्रति किलोग्रॅम (Silver Price Today) आहे. चांदीचा भाव सकाळी 67,890 वर ओपन झाला होता. त्यानंतर काहीशा वाढीसह ट्रेड करत आहे. मागील चांदीच्या दराच्या तुलनेत आज भाव अधिक उतरला आहे.

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण शहरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर; पहिल्या दहामध्ये भारतातील 4 शहरं

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दर घसरला आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळतो आहे. रशिया – युक्रेन दरम्यान सुरू असलेलं युद्ध संपलं तर ग्लोबल मार्केटमध्ये सोने दरात मोठी घसरण होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून ते ग्लोबल मार्केटमध्ये विकण्याचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होऊ शकतात. युक्रेनने रशियाच्या अटी मानून युद्ध संपवल्याचे संकेत दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.