Take a fresh look at your lifestyle.

सोन्याची झळाळी उतरली, नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण!

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यान सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. होळीच्या सणानिमित्ती भारतीय सराफा मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या भावात तेजी दिसून आली होती. मात्र आता त्यात मोठी घसरण जाल्याचं बघायला मिळालं आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

MCX वर सोने दर सर्वोच्च स्तरावरुन जवळपास 4000 रुपये कमी झाला आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव शुक्रवारी 51,475 रुपयांवर बंद झाला, जो गुरुवारच्या दरापेक्षा 0.33 टक्क्यांनी कमी आहे. याआधी सोन्याचा सर्वोच्च दर 55,558 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

युक्रेन तणाव घटल्याचा परिणाम

हेही वाचा – ‘द काश्मीर फाइल्स’ने मोडला ‘दंगल’चा रेकॉर्ड, आतापर्यंत केली तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

जाणकारांच्या मते युक्रेन-रशियामधील संघर्ष काही प्रमाणात निवळल्याने सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. यामध्ये काही प्रमाणात, अमेरिकन डॉलर हा देखील एक महत्त्वाचा घटक मानला जातोय. त्यामुळेच सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावरुन चांगलेच खाली आले आहे.

…तर आणखी महागाई वाढेल

हेही वाचा – होळीच्या सणात रंगाचा बेरंग; धुळवडीत फुगा मारल्यानंतर रिक्षा उलटली, पहा थरारक व्हिडिओ….

रशियावर सुरू असलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे पुरवठा साखळीतील अडचणी वाढतील आणि महागाई वाढेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सोन्याच्या किमतीवर काही दिवसांत दबाव दिसू शकतो, परंतु त्याचा परिणाम मध्यम ते दीर्घकाळात सकारात्मक होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा – गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात ‘हा’ आरोपी हजर, तर्कवितर्कांना उधाण

2021 मध्ये सोन्याच्या आयातीत मोठी वाढ

दरम्यान, भारताची सोन्याची आयात 2021 मध्ये वाढून 1,067.72 टन झाली, जी कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये 430.11 टन होती. सर्वाधिक 469.66 टन सोने स्वित्झर्लंडमधून आयात करण्यात आले. यानंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून 120.16 टन, दक्षिण आफ्रिकेतून 71.68 टन आणि गिनीमधून 58.72 टन सोने आयात करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.