Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today: सोन्याच्या दरात सहाव्या दिवशी घसरण, आठवडाभरात सोनं 1600 रुपयांनी स्वस्त

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – सोने खरेदी करण्याची सध्या योग्य वेळ आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही जागतिक बाजारात मंदीमुळे सोन्याच्या दरात (Gold Price Today) सलग सहाव्या दिवशी घसरण झाली. सोमवारीही सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी घसरला. आठवडाभरातच त्याच्या किमती 1,600 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

अखेर Elon Musk ची खेळी यशस्वी! Twitter विकत घेण्यासाठी मोजली ‘इतकी’ किंमत

मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची फ्युचर्स किंमत सोमवारी सकाळी 0.44 टक्क्यांनी किंवा 230 रुपयांनी घसरून 52,030 रुपये प्रति ग्रॅम झाली. चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण झाली आणि फ्युचर्सचा भाव 1.25 टक्क्यांनी किंवा 829 रुपयांनी घसरून 65,717 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सहा व्यापार सत्रांमध्ये सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 1600 रुपयांची घसरण झाली आहे.

तात्काळ जमा करा तुमचं रेशनकार्ड, अन्यथा सरकार करणार कडक कारवाई

जागतिक बाजारातील भाव दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर

यूएस फेड रिझर्व्हने चलनविषयक धोरणे कडक करण्याचे आणि व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या स्पॉट किमतीने दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली आहे. सोमवारी सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.3 टक्क्यांनी घसरून 1,923.74 डॉलर प्रति औंस झाली. 7 एप्रिलनंतरची ही सर्वात कमी किंमत आहे.

IPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात BCCI चा मोठा निर्णय

सोन्याचा भाव 52 हजारांच्या खाली जाईल

पुढील महिन्यात अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक बाजारात सोने प्रति औंस $1,905 पर्यंत जाऊ शकते, तर भारतीय बाजारात ते 52 हजारांच्या खाली जाईल. सोने 51,650 ते 52,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या श्रेणीत राहील, असा तज्ञांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.