Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today तर चांदीचा भाव वधारला; तपासा आजचा लेटेस्ट रेट

maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली – Gold Price Today आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी सोने वायदे भाव (Gold Price Today) घसरला आहे. परंतु चांदीचा भाव वधारला (Silver Price Today) आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने-चांदी दरात घसरण झाली आहे.

येत्या तीन दिवसांत पाऊसच पाऊस! जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा वायदे भाव 82 रुपये कमी होऊन 51,075 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी MCX वर सोन्याचा भाव 51,109 रुपयांवर ओपन झाला होता. परंतु विक्री वाढल्याने लवकरच 0.16 टक्क्यांच्या घसरणीसह 51000 रुपयांजवळ आला. याआधी मागील अनेक सत्रात सोन्याचा वायदे भाव वाढला होता, परंतु डॉलरमध्ये आलेल्या मजबूतीमुळे सोने दर पुन्हा एकदा घसरला आहे.

मोठी बातमी! मोदी सरकार जगाला देणार आणखी एक झटका; लवकरच मोठा निर्णय होणार?

चांदीचा भाव वधारला –

सोने दर कमी झाला असताना, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टीकमॉडिटी एक्सचेंजवर बुधवारी चांदीचा वायदे भाव 10 रुपयांच्या वाढीसह 61,986 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. याआधी हा दर 61,996 रुपयांवर ओपन झाला होता. परंतु काही वेळात यात घसरण झाली. या घसरणीनंतरही किंमत 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 62 हजारांच्याजवळ पोहोचला आहे.

सरकारी बँकेच्या निर्णयाने खातेधारकांना झटका, तर खासगी बँकांकडून गूड न्यूज

तपासा सोन्याची शुद्धता –

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

लग्नसराईच्या दिवसांत वाढली सोन्याची मागणी, तपासा आजचे दर

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्यात काय आहे फरक?

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत फरक असतो. प्रमुख फरक सोन्याच्या शुद्धतेचा असतो. 24 कॅरेट सोनं 99.9 टक्के शुद्ध असतं. तर 22 कॅरेट सोनं 91 टक्के शुद्ध असतं. यात 9 टक्के इतर धातू मिक्स असतात. तर 24 कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसते. परंतु 99.9 टक्के इतक्या शुद्ध असलेल्या 24 कॅरेट सोन्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Comments are closed.