Take a fresh look at your lifestyle.

सापडलेले साडेतीन लाखाचे दागिने केले परत; उकिर्डे यांचे सर्वञ कौतुक

0

गुरुप्रसाद देशपांडे, ओटीटी न्यूज नेटवर्क

नेवासा : येथील रघुजन गॅस एजन्सीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करणाऱ्या रमेश चंद्रकांत उकिर्डे याला सापडलेल्या पर्समधील बॅगेत तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज मिळाला. त्याने सापडलेली पर्स प्रामाणिकपणे परत केली केल्याची घटना नेवासा येथे घडली. या प्रामाणिक कामगाराचे सर्वञ कौतुक केले जात आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नेवासा बसस्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला एक पर्स उकिर्डे या कामगाराला दिसली आणि त्यामध्ये दोन मोबाइल सोन्याचे दागिने आणि काही रोकड अशा स्वरुपात एकुण साडेतीन लाखांचा ऐवज त्यांना त्यामध्ये दिसला. त्यांनी पर्स बघितली असता नेवासा येथील अंगणवाडी सेविका मन्नाबी रफिक बागवान यांची असल्याचे समजले. या कामगाराने नेवासा येथील डॉ. बागवान यांच्याशी संपर्क साधून सापडलेला संपूर्ण ऐवज त्यांच्याकडे परत केला. डॉ बागवान यांनी ही वस्तुस्थिती मन्नाबी बागवान यांना सांगितली असता अंगणवाडी सेविकेने या कामगाराच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन पेढे देऊन कौतुक केले. रघुजन गॅस एजंन्सीमध्ये सिलेंडर पुरवठा करणाऱ्या प्रामाणिक कामगाराचे संपूर्ण नेवासा तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.