Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात आज घसरण; किती स्वस्त झालं सोनं?

0
maher

ओटीटी न्यूज नेटवर्क

मुंबई – काल सोन्या – चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात सराफा बाजारात मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 281 ​​रुपयांनी घसरून 46322 रुपयांवर आला. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 107 रुपयांनी घसरून 50,770 रुपयांवर आला. चांदीचा आजचा भाव 56,046 रुपयांवर उघडला.

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,770 रुपये आहे. काल सराफा बाजारात सोन्याचा भाव 50,877 रुपयांवर बंद झाला. आज दरात 107 रुपयांची घसरण झाली. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 50,567 रुपये होती. 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 46,322 रुपये होती. तर 18 कॅरेटची किंमत 37,928 रुपयांवर पोहोचली आहे. 14 कॅरेट सोन्याचा दर 29,583 रुपये होता.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.