Take a fresh look at your lifestyle.

BSNL ग्राहकांसाठी खुशखबर! ‘इतक्या’ रुपयांमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल अन् बरंच काही…

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन वार्षिक प्रीपेड योजना लॉन्च केली आहे. BSNL च्या या नवीन प्लानची किंमत 321 रुपये आहे. या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची वैधता 365 दिवस म्हणजेच 1 वर्ष आहे. याचा अर्थ 321 रुपयांच्या रिचार्जवर बीएसएनएल सिम पूर्ण वर्ष चालू राहील. पण बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन सर्वसामान्य ग्राहकांसाठी नाही. विशेषत: तामिळनाडूमधील पोलिस अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.

बीएसएनएल प्लॅन

321 रुपयांचा BSNL प्लॅन फक्त तामिळनाडूच्या पोलीस अधिकार्‍यांसाठी सुरू करण्यात आला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहक इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही कॉल्स मोफत करू शकतात. मात्र ही सुविधा फक्त दोन पोलीस अधिकाऱ्यांमधील संभाषणासाठी आहे.

राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम; ‘या’ नेत्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य

या फोन नंबरवरून इतर कोणत्याही व्यक्तीला कॉल करण्यासाठी 7 पैसे प्रति मिनिट (स्थानिक BSNL नेटवर्कवर) आणि 15 पैसे प्रति मिनिट (STD कॉल) खर्च येईल. BSNL च्या या प्लॅनमध्ये कॉलिंग व्यतिरिक्त दरमहा 250 SMS देखील मिळतात.

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दरमहा 15 GB मोफत डेटा मिळतो. हा बाजारातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे जो 1 वर्षाच्या वैधतेसह येतो. ही योजना फक्त तामिळनाडूच्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी आहे. दरम्यान, सरकारी कंपनीने AzadiKaAmritMahotsavPV_2022 अंतर्गत ही योजना सुरू केली आहे. कृपया लक्षात घ्या की, ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे आणि केवळ ३१ ऑगस्टपर्यंत खरेदीसाठी उपलब्ध असेल.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.