Take a fresh look at your lifestyle.

धोनीच्या चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’; CSKच्या कर्णधारपदी पुन्हा माही

0

ओटीटी न्यूज नेटवर्क

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार म्हणून पुनरागमन करणार आहे. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International cricket) निवृत्ती घेतलेला धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळत आहे. अशा स्थितीत धोनी पुढच्या सत्रातही खेळणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, धोनी पुढील आयपीएल खेळणार नाही तर चेन्नई संघाचे नेतृत्वही करणार आहे.

चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विश्वनाथन म्हणाले की, “महेंद्रसिंग धोनी पुढील आयपीएल सत्रात चेन्नई संघाचा कर्णधार असेल. या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या मोसमात रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.”

एका मिनिटात मानवी शरीराचे अंग ओळखणे आणि बोलण्याचा जागतिक विक्रम

धोनीने चारवेळा विजेतेपद दिले मिळवून

आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून धोनी चेन्नई संघाचे नेतृत्व करत आहे. त्याने सर्वाधिक चारवेळा संघाला जेतेपदापर्यंत नेले आहे. मागील आयपीएल 2022 सत्रात चेन्नई फ्रँचायझीने काही बदल केले होते. फ्रँचायझीने पहिल्यांदाच धोनीला कर्णधारपदावरून हटवले. धोनीने स्वत: रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवले. मात्र या मोसमात संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली.

ए फॉर अमेठीनंतर आता बी फॉर बारामतीचा परफेक्ट कार्यक्रम : भाजपाची तयारी

त्यानंतर जडेजाने कर्णधारपद अर्धवट सोडले. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने सुरुवातीच्या 8 पैकी फक्त 2 सामने जिंकले. त्याचवेळी जडेजाच्या कामगिरीवरही परिणाम झाला. फलंदाजी आणि गोलंदाजीत तो फ्लॉप दिसत होता. त्यानंतर स्वतः जडेजाने कर्णधारपदाचा राजीनामा देत पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले. पण तरीही चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

दरम्यान, अशा परिस्थितीत 41 वर्षीय धोनी पुन्हा मैदानात खेळताना दिसणार की नाही? अशी शक्यता वर्तवली जात होती. पुढील आयपीएल सत्रात चेन्नईला नवा कर्णधार मिळू शकतो, असे मानले जात होते. पण आता धोनी चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार असल्याचे फ्रँचायझीने स्पष्ट केले आहे.

असेच सुपरफास्ट अपडेट मिळवण्याकरिता या लिंकवर क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.